यंदा आमच्याकडे दिवाळी नाही,...माझे प्राधान्य दुष्काळाला शरद पवारांचा मोठा निर्णय, पाणी आणि चार्‍याच्या टंचाईवर सरकारकडे मदतीची मागणी

Foto
सोलापर : राज्यात पाणीटंचाई वाढली आहे. दरम्यान,खासदार शरद पवार यांनी दुष्काळग्रस्त भागाचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. सध्या शेतकरी आणि जनता भीषण पाणी व चार्‍याच्या समस्येला तोंड देत आहे. त्यामुळे यंदा आमच्याकडे कोणतीही दिवाळी साजरी होणार नाही, माझे संपूर्ण लक्ष दुष्काळ निवारणावरच केंद्रित आहे, असा निर्णय शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केला. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यासह दुष्काळग्रस्त भागांना भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शरद पवार म्हणाले की, स्थानिक आमदारांसमवेत प्रत्यक्ष गावोगावी जाऊन नागरिकांच्या अडचणी जाणून घेणार आहे. जनावरांच्या चार्‍याचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट झाला असून, राज्य सरकारकडे तातडीच्या मदतीची विनंती केली जाईल आणि सरकारकडून ती मदत मिळेल, अशी खात्री आहे. तसेच खडकवासलासह प्रमुख धरणांमधील पाणीसाठ्याचा वापर आजपासून थेट जून महिन्यापर्यंत अत्यंत काळजीपूर्वक आणि नियोजनबद्ध पद्धतीने करावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.

माझे प्राधान्य दुष्काळाला
शरद पवार म्हणाले की, ज्ञानेश कुमार आणि केंद्र सरकारने संबंधित विषयात तातडीने निर्णय घेणे आवश्यक होते. मात्र तो न झाल्याने आज दिल्लीत विरोधी पक्षांचे नेते एकत्र येत आहेत. या आंदोलनात पक्षाच्या वतीने खासदार सुप्रिया सुळे आणि संजय राऊत सहभागी होत आहेत. मात्र, सध्या माझे प्राधान्य केवळ शेतकरी, पाणी, चारा आणि दुष्काळाच्या प्रश्नांनाच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राजकारणाची ही वेळ नाही; एकत्र येऊन संकटावर मात करा
मी याकडे कोणत्याही राजकीय दृष्टिकोनातून पाहत नाही. ही राजकारण करण्याची वेळ नसून सर्वांनी मिळून या संकटावर मात करण्याची गरज आहे. राज्यात कुठलीही अराजकता नसून प्रत्येकाने मदतीचा हात पुढे केला पाहिजे, असे ते म्हणाले.

तसेच नुकसानग्रस्तांना पाच हजार रुपयांची मदत देण्याबाबत मुख्यमंत्री आणि दिल्ली दरबारी चर्चा झाली असून त्यावर लवकरच तोडगा निघेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, उजनी येथील प्रस्तावित एआय प्रकल्पाबाबत बोलताना, प्रकल्प आला म्हणजे पाणी संपले असे होत नाही, तरीही पाण्याचा वापर जपूनच व्हावा लागेल. या प्रकल्पाची संपूर्ण माहिती घेऊन आवश्यक त्या सुधारणा सुचवल्या जातील, असेही शरद पवार यांनी नमूद केले.